Achivements & Awards

Special Achivements

• 2 JANUARY 2008 अशोकनगर माननीय मंत्री महोदय छगन भुजबळ यांचे हस्ते नवीन इमारतीचे उद्घाटन.
• प्रणय चाळके international swimming competition मध्ये प्रथम.
• Fire shooting मध्ये 3 विद्यार्थी विजयी.

Sports Achivements

• धुळे येथे राज्यस्तरीय सायकल स्पर्धेत सहभाग.
• भगुर येथे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत सहभाग.
• नाशिक JET TOY राज्यस्तरीय स्पर्धेत विजयी.
• राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत सहभाग.
• स्काऊट गाईड नॅशनल रॅली – माननीय पंतप्रधानांची भेट.

ACCADEMIC COURSES

• स्कॉलरशिप परीक्षा.
• ENGLISH marathon स्पर्धेत 90% विद्यार्थ्यांचा सहभाग व 100% रिझल्ट.
• 2012-13- भारत सरकार तर्फे घेण्यात येईल येणाऱ्या इन्स्पायर अवॉर्ड सायन्स एक्जीबिशन मध्ये इयत्ता नववीचा विद्यार्थी दीपक सोनवणे याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली या विद्यार्थ्यांनी हॅन्ड मिक्सरची प्रतिकृती तयार केली होती.
• 2012-13- पालक विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिक यांच्या प्रबोधनासाठी सौ अपर्णा रामतीर्थकर, प्रसिद्ध समाज प्रबोधनकार यांना विद्यालयातर्फे निमंत्रण देण्यात आले होते. त्यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम संपूर्ण परिसरामध्ये परिसरातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आला होता. संस्थेचे दिवंगत पदाधिकारी श्री. डॉक्टर झेड एस बंधुरे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.
• 2014-15- नाशिक मधील के के वाघ अभियांत्रिकी विद्यालयांमध्ये घेण्यात येणाऱ्या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यालयातील विद्यार्थी पार्थ गायकवाड यांच्या 'ड्रेनेज सफाईसाठी रिमोटवर चालणारी यंत्रणा' या प्रकल्पाला तृतीय क्रमांक, मानचिन्ह व रोख 9000 रुपये असा पुरस्कार मिळाला होता. 'ड्रेनेज स्वच्छ करताना कामगारांचा गुदमरून होणारा मृत्यू टाळणे' हा या प्रकल्पाचा विषय होता.
• 24 डिसेंबर रोजी दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या ग्राहक दिन या उपक्रमांतर्गत ग्राहक मंच नाशिक यांच्याकडून- विद्यालयाला अनेक वेळा, 'विद्यार्थी तसेच पालकांमध्ये वेळोवेळी केलेल्या जागृती बद्दल' उपक्रमशील शाळा म्हणून गौरविण्यात आले आहे.
• 1 ते 10 ऑक्टोबर – दैनिक गावकरी कडून वन्यजीव सप्ताह निमित्त वन्य जीवनावर आधारित देखावा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये विद्यालयाचा तृतीय क्रमांक आला होता मानचिन्ह प्रशस्तीपत्रक व रोख बक्षीस मिळाले.
• रेडिओ विश्वास 90.8 येथे विद्यालयातर्फे उपशिक्षिका सौ. पाठक मुक्ता व विद्यार्थिनी कु. प्रियंका पवार प्रतिनिधी यांनी वटपौर्णिमेनिमित्त भारतीय सण आणि विज्ञान या विषयावर एक तासाचा कार्यक्रम सादर केला.
• कैलासवासी लपा सुमन वक्तृत्व स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय सहभाग असतो.
• अत्त दीप भव मेडिकल मेडिकोज सोशल वेल्फेअर असोसिएशन तर्फे सम्राट अशोक महात्मा फुले एवं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येते त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग हा विजयी सहभाग असतो.
• ग्रंथ तुमच्या दारी उपक्रमांतर्गत विद्यालयाला ग्रंथ पेटी दिली गेली आहे व या ग्रंथपेटीचा विद्यार्थी व शिक्षक दोघेही उपयोग करून घेत आहेत.
• दैनिक भ्रमर तर्फे आयोजित निबंध स्पर्धेमध्ये विद्यालयाला विशेष पुरस्कार देण्यात आला दैनिक भ्रमरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
• भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा मध्ये 125 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला.
• 2019-20- भारत सरकार निती आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या देण्यात येणाऱ्या नवीन संशोधन वृत्तीला वाव देण्यासाठी पूरक अशी अटल टिंकलिंग लॅब मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले व जून 2020 या वर्षी अटलब विद्यार्थ्यांसाठी मंजूर झाली विद्यालयामध्ये शासन निधी मधून या प्रयोगशाळेची स्थापना झाली आहे यासाठी विशेष प्रयत्न. या अटल टिंकरिंग लॅब साठी तत्कालीन मुख्याध्यापिका श्रीमती कासारे एसबी विज्ञान शिक्षिका सौख शिरसागर एम एस व लिपिक श्री मोहिते एपी यांनी अथक मेहनती मेहनत केली व संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय शिरसाट सर यांनी त्यांना मुलाचे मार्गदर्शन केले.

EXTRA CURRICULAR

• विद्यालयातील विद्यार्थी विविध शालेय व अंतर शालेय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय सहभाग घेतात..
• नाशिक मध्ये आयोजित 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या साहित्य संमेलनाच्या काळामध्ये करोनाचे सावट नाशिक वर होते, या साहित्य संमेलनाच्या नांदीची तुतारी संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्या शाळेत वाजवण्यात आली. ग्रंथदिंडीचे आयोजन करून या साहित्य संमेलनाची नांदी करण्यात आली. परिसरातील नाशिक मधील व साहित्य संमेलनातील अनेक मान्यवर या ग्रंथदिंडीला विद्यालयामध्ये उपस्थित होते. विद्यार्थी व पालक व शिक्षक यांचा सहभाग येथे होता. नागरिकांचा सहभाग उल्लेखनीय होता. विद्यालयाच्या तत्कालीन मुख्याध्यापिका श्रीमती कासारे एसबी यांच्या पथक परिश्रमाने हे सर्व घडून आले.